इयत्ता 1ली पूर्वतयारी

            इयत्‍ता पहिलीत मुले दाखल होणार आहेत.त्‍यांना आपल्‍याला मुळाक्षरेशिकवायची आहेत.त्‍यासाठी आपल्‍यालाज्ञानरचनावादी पध्‍दतीचा थोडा अभ्‍यास करावा लागेल.कृतीयुक्‍त अध्‍यापनामुळे भरपूर फायदा होणार आहे.पाठांतर केलेले मुल हळुहळु विसरत चालते,जर त्‍याचा सातत्‍याने सराव झाला नाही तर.उदा.आपण जर पाहीले की एखादा विदयार्थी आपण इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत टाकला तर सुरूवातीला तो कोणतीही गोष्‍ट एकदम चाणक्षपणे सांगत असतो.पण कालांतराने आई वडीलच सांगतात की,हा एवढा हुशार होता ना.......................

चला पहिलीची पुर्वतयारी पहीली पाहूया.

मुलांच्‍या बोटांनांही व्‍यायाम दयावा लागेल.शाळेत आल्‍याआल्‍या जर त्‍याला Direct पाटीवर अ,आ...................नको घ्‍यायला.ज्ञानरचनावाद सांगतो की बोटांना सुध्‍दा व्‍यायाम जर दिला तर बोंटांमध्‍ये सुसूत्रता येते.

मुलांना करायला लावूया.....

हया एवढया वस्‍तू डब्‍यात भर.

चिंचोक 3 बोटांनी वेचून आण.

2 बोटांनी खडे उचल.

2 बोटांनी मणी रांगेत लाव.

हाताच्‍या अंगठयाने पायाच्‍या इतर बोटांना स्‍पर्श कर.

3 दोरींच्‍या वेणी घालणे.

वरील सर्व गोष्‍टी केल्‍याने पेन्सिल व्‍यवस्थित धरून ती हवी तशी गिरवता येते आणि मुलांची अक्षरे कमालीची सुधरतात.

श्री.अमर केदारी


ज्ञानरचनावादावर विश्‍वास ठेवून व त्‍याची काटेकोर अंमलबजावणी केल्‍यास आणि पारंपारीकतेला फाटा देवून नविनतेचा स्विकार आपण तर केला तर यश १०० टक्‍के आपल्‍याला मिळेलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा